vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे — डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे — डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

 

ठाणे, प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची’ (SIR) पूर्वतयारी सध्या सुरू आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघांतील मतदारांचे ‘सन 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग’ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

मॅपिंग प्रक्रिया नेमकी काय आहे?   सन 2002 मध्ये शेवटचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम झाला होता. आता पुन्हा तीच प्रक्रिया राबवली जाणार असल्याने, सध्याच्या मतदार यादीतील नावांची जुन्या (2002 च्या) नोंदींशी सांगड घातली जात आहे. हे मॅपिंग दोन प्रकारे करता येईल:1. Person to Person Mapping: ज्या मतदारांचे नाव 2002 च्या यादीत आधीपासूनच होते, त्यांनी थेट स्वतःच्या नावाचे मॅपिंग करावे.2. Progeny Mapping: ज्या तरुण मतदारांची नावे 2002 मध्ये नव्हती, त्यांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या 2002 मधील नावाचा आधार घेऊन आपले नाव लिंक (Mapping) करावे.

तुमचा 2002 चा तपशील कसा शोधाल?   मॅपिंगसाठी मतदारांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा २००२ मधील यादीभाग क्रमांक (Part No.) आणि अनुक्रमांक (Sr. No.) आवश्यक आहे. हा तपशील मिळवण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे       भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. तेथे उपलब्ध असलेल्या 2002 च्या मतदार यादीच्या PDF फाईल्समधून आपल्या कुटुंबाचा जुना तपशील शोधावा.

नागरिकांनी काय करावे?1. ऑनलाईन पोर्टलवरून स्वतःचा किंवा पूर्वजांचा 2002 मधील तपशील मिळवावा.2. हा तपशील घेऊन आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची भेट घ्यावी.3. याशिवाय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपले आणि आपल्या कुटुंबाचे मॅपिंग पूर्ण झाल्याची खात्री करावी.      “मतदार यादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी हे मॅपिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित ‘बीएलओ’शी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या-जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा इच्छुकांनी सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये दि.31 जुलै 2025 पर्यंत अर्ज प्रत्यक्ष सादर करावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथेकेळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत शासन सकारात्मक- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाट

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

vishwatmaklokswamivarta

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ;वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कोटणीस कॉम्प्लेक्स नूतनीकरण कामाचे भूमिपूजन