vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भैय्यासाहेब देशमुख यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा- भैय्यासाहेबांसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकारणात विरळा : हर्षवर्धन सपकाळ

भैय्यासाहेब देशमुख यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा- भैय्यासाहेबांसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकारणात विरळा : हर्षवर्धन सपकाळ

राज्य प्रतिनिधी –

देऊळगाव साकरशा, : भैय्यासाहेब देशमुख यांच्यासारखे निःस्पृह, संयमी, अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रात विरळा आहेत. सध्या राजकीय वातावरण बदलले असून, समाजात एकूणच राजकीय चारित्र्याची पुनर्बांधणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे केले.

        ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सोहळा देऊळगाव साकरशा येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. दत्तात्रय पाचपवार गुरुजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी आमदार संजय रायमुलकर, काँग्रेस नेते श्याम उमाळकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री. सपकाळ म्हणाले की, भैय्यासाहेबांचे समाजासाठी मोठे योगदान असून, राजकारणातही त्यांची प्रगल्भ, विवेकी भूमिका राहिली. त्यांच्या सर्वमान्य नेतृत्वामुळे आशाताई जिल्हा परिषदेत बिनविरोध निवडून आल्या. आज अशी व्यक्तिमत्व राजकारणात दुर्मिळ आहेत. श्री. रायमुलकर म्हणाले की, भैय्यासाहेबांनी कुणाविषयीही कटुता न बाळगता सर्वांशी जिव्हाळा जपला. त्यांचे नेतृत्व पक्षातीत राहिले. श्री. उमाळकर म्हणाले की, भैय्यासाहेबांनी नागरिकांच्या हिताची अनेक कामे केली. उतावळी नदीला महापूरावेळी त्यांनी तत्काळ लक्ष वेधल्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा दौरा होऊन आपदग्रस्ताना वेळेत मदत मिळू शकली. यावेळी श्री. देशमुख यांची ग्रंथतुला, विनामूल्य अभ्यासिका भूमीपूजन व ७५ वृक्ष लागवड करण्यात आली. गजानन तात्या कृपाळ, चांद शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, माजी नगराध्यक्ष कासम गवळी, काँग्रेस उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अलीमभाई ताहेर, अनंतराव वानखेडे, माजी कृषी सभापती केशवराव जागृत, गजानन तात्या कृपाळ, श्रीकृष्ण देवकर, ॲड. सुरेश वानखेडे, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, संपतराव बापू देशमुख, जानेफळचे सरपंच गजाननराव वडनकर, मोहनजी धोटे, मेहकर तालुका शिवसेना प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख लिंबाजी पांडव, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप देशमुख, नंदूभाऊ बोरे, वसंतराव देशमुख, डिगांबर मवाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्करराव ठाकरे, चित्रांगण खंडारे, प्रमोद देशमुख, राहुल देशमुख, संतोषराव नरवाडे, देवानंद पवार, डॉ. शेषरावजी ब्रदर, डॉ. हेमराज राठी, डॉ. भरत आल्हाट, विनायक टाले, शैलेश सावजी, सुधाकरराव धाबे, विष्णूजी पाखरे, अभिमन्यू नवले, केशवराव फुके, संतोषराव तोंडे, संदिप क-हाळे, सोशल मीडिया काँग्रेस अध्यक्ष संदिप ढोरे, रूपेश ढोरे यांच्यासह तालुक्यातील विविध समाजांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र दिनाची पूर्व तयारी आढावा बैठक…

महिलासक्षमीकरणप्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भिवंडीच्या ‘भावना’ झाल्या स्वावलंबी-ब्युटी पार्लर व्यवसायातून कोरली यशाची नवी पाऊलखूण!

युद्ध पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन कार्य केंद्र 24X7 कार्यरत ठेवावे*– *निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के*

भारत माता की जय’च्या गजरात दुमदुमली कामठी नगरी – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर कामठीत तिरंगा यात्रा

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta