vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्वप्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्वप्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

रायगडअलिबाग,द प्रतिनिधी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदला मध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि.15 जून ते दि.28 ऑगस्ट 2026 या कालावधीत CDS कोर्स क्र.67 आयोजित करण्यात येत आहे. याकरिता रायगड जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रायगड-अलिबाग येथे दि.02 जून 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune यांच्या वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावर जाऊन DSW Portel (Resources PCTC Nshik CDS67) (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

निवड केलेल्या प्रशिक्षणार्थींनी दि.14 जून 2026 सकाळी 10.00 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

 या सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत-उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. (CDS) या परीक्षेकरिता आनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

 अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्वप्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.potenashik@gmail.com, व दूरध्वनी क्र.0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र.9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.

००००००

संबंधित पोस्ट

कल्याण येथील मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथील कोलशेत खाडी येथे अनधिकृत रेती उत्खनन करणारे 1 बार्जेस व 2 सक्शन पंप नष्ट

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी व्यापक उद्देश ठेवून ठोस अंमलबजावणीवर भर द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ला वेग

आज बारामती विधानसभा पोट निवडणूक2026- राज्याचे उपमुख्यमंत्री उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांनी जिल्हा  परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला…

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाऊबीज निमित्त दहिसर रिवर फेस्टिवल ला सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta