vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

ऑपरेशन रेजपिल एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे केले उद्ध्वस्त; भारतामध्ये पहिल्यांदाच, पश्चिम आशियात वापरल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या सायकोट्रॉपिक पदार्थाची जप्तीची कारवाई

ऑपरेशन रेजपिल एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे केले उद्ध्वस्त; भारतामध्ये पहिल्यांदाच, पश्चिम आशियात वापरल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या सायकोट्रॉपिक पदार्थाची जप्तीची कारवाई

राज्य प्रतिनिधी-

आंतरराष्ट्रीय सिंथेटिक (कृत्रिम) अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यांविरोधात एक मोठी कामगिरी करत, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (NCB) ‘ऑपरेशन रेजपिल’ अंतर्गत कॅप्टागॉन (Captagon) च्या तस्करीत गुंतलेले एक आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट उघडकीला आणले आहे. या कारवाईत अंदाजे 227.7 किलोग्रॅम कॅप्टागॉन गोळ्या/पावडर जप्त करण्यात आली असून, या सिंडिकेटचा सदस्य असलेल्या आणि भारतात मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका सिरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. कॅप्टागॉनमध्ये प्रामुख्याने ‘फेनेटीलाइन’ (Fenetylline) आणि ‘अँफेटामाइन’ (Amphetamine) चा समावेश असतो, जे एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत सायकोट्रॉपिक म्हणजे मानसिक स्थितीवर परिणाम करणारे पदार्थ आहेत.

ऑपरेशन रेजपिल’ मोहीम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एनसीबीच्या धाडसी आणि अतिशय दक्ष असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ‘ऑपरेशन रेजपिल’ च्या माध्यमातून आपल्या यंत्रणांनी “जिहादी ड्रग” म्हणून ओळखले जाणारे कॅप्टागॉन भारतात पहिल्यांदाच जप्त केले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

अमित शाह यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले:”मोदी सरकार ‘अंमली पदार्थ मुक्त भारत’ घडवण्यासाठी वचनबद्ध आहे. ‘ऑपरेशन रेजपिल’ द्वारे आमच्या यंत्रणांनी ₹182 कोटी किमतीचे, “जिहादी ड्रग” म्हणून ओळखले जाणारे कॅप्टागॉन देशात पहिल्यांदाच जप्त केले आहे, हे सांगताना आनंद होतो आहे. पश्चिम आशियामध्ये पाठवल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांची खेप पकडणे आणि एका परदेशी नागरिकाला अटक करणे, हे अंमली पदार्थांविरुद्धच्या आमच्या ‘शून्य सहनशीलता (झिरो टॉलरन्स’) धोरणाचे उत्तम उदाहरण आहे. मी पुन्हा सांगतो की भारताच्या भूमीचा सोयीचे वाहतूक केंद्र म्हणून वापर करून भारतात येणाऱ्या किंवा देशाबाहेर जाणाऱ्या अंमली पदार्थांच्या प्रत्येक ग्रॅमवर आम्ही कडक कारवाई करू. एनसीबीच्या धाडसी आणि दक्ष जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन.”ऑपरेशन रेजपिल दरम्यान जप्त करण्यात आलेल्या एकूण 227.7 किलोग्रॅम कॅप्टागॉन गोळ्या/पावडरची आखाती आणि पश्चिम आशियायी देशांमधील आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारपेठेतील अंदाजे किंमत सुमारे ₹182 कोटी आहे.

ही कारवाई भारतातील कॅप्टागॉनच्या जप्तीची पहिली कारवाई असून, याद्वारे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट्सकडून भारताचा सोयीचे वाहतूक केंद्र म्हणून वापर करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते उघड झाले आहेत. वेगवेगळ्या अधिकारक्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी आणि मोडून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांमधील सहकार्य किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, तसेच जागतिक स्तरावरील अंमली पदार्थ विरोधी यंत्रणा आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट्स उद्ध्वस्त करण्यासाठी कशा एकत्र येऊ शकतात, याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे तरुणावर फायरिंग करणारे 6 आरोपी २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

vishwatmaklokswamivarta

रणवीर अल्लाबदिया, समय रैना यांच्याविरुद्ध असभ्य वक्तव्यावरून एफआयआर केल्यानंतर आसाम पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले

vishwatmaklokswamivarta

लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्लीतून अमीर रशीद अली नावाच्या काश्मिरी रहिवाशाला अटक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

vishwatmaklokswamivarta