vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान*जिल्ह्यात आचारसंहिता लागू

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान*जिल्ह्यात आचारसंहिता लागू

     अमरावती, प्रतिनिधी: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अमरावतीचा समावेश असल्याने मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तातडीने लागू करण्यात आली आहे.

    अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.   निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करणे, १ जून रोजी नामांकने (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची अंतिम तारीख, २ जून रोजी नामांकनांची छाननी, ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान, २२ जून रोजी मतमोजणी, २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे.

0000000

संबंधित पोस्ट

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल..

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादभाजपा नवीन जालना मंडळात ५५ रक्तदात्यांचे अमूल्य योगदान..

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे राखीव प्रवर्गाचे 389 अर्ज प्राप्त- मेघराज भाते

vishwatmaklokswamivarta

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

दिवाळीपूर्वी वेतन अदा करा : आमदार सुधाकर अडबाले मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच प्रधान सचिवांकडे मागणी…

राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड