vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारत सरकार पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

भारत सरकार पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

जालना,द प्रतिनिधी: महाडिबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता शैक्षणिक वर्ष 2021-22,2022-23,2023-24,2024-25 या कालावधीतील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती राज्य शासनाची शिक्षण शुल्क (फ्रिशिप) प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता विद्यावेतन या सर्व योजनांची 1 हजार 100 अर्ज अद्यापि विद्यार्थी व महाविद्यालयास्तरावर प्रलंबित आहेत. सदर अर्ज निकाली काढण्याबाबत वारंवार कार्यालयामार्फत सूचना करण्यात आल्या आहेत. तथापि अजूनही अर्ज प्रलंबित असल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत असलेली उदासीनता यावरुन दिसून येते.

जिल्ह्या तील सर्व महाविद्यालयांनी, आपल्या स्तरावरील शैक्षणिक वर्ष 2021-22 ते 2024-25 या कालावधीत प्रलंबित अर्ज निकाली काढावेत तसेच विद्यार्थी स्तरावरील प्रलंबित अर्जाबाबत विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून विद्यार्थी स्तरावरील अर्ज दि. 24 मे 2026 पर्यंत निकाली काढण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण राजू एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कोल्हापूर येथे पहिल्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे वितरण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

य युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संसदेच्या केंद्रीय सभागृहात त्यांच्या प्रतिमेस सदस्यांनी पुष्पांजली अर्पण केली.

पानेवाडीत रंगला कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांना घाटगे पाटलांच्या मानाची बक्षिसे -पानेवाडीत कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांचा सत्कार!

विधानसभा निवेदन :-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत- सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ जिल्हा स्त्री रुग्णालय येथे थेट प्रक्षेपणाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta