vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा नंबर प्लेट बसवण्यास 30 जून पर्यंत मुदत 

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा नंबर प्लेट बसवण्यास 30 जून पर्यंत मुदत

 

नांदेड प्रतिनिधी :- जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व वाहनचालकांनी अधिकृत https://mhhsrp.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरून 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे.

एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनाचे काम जसे वाहन हस्तांतरण, वाहनाची पुन: नोंदणी, वाहनाचे वित्तदात्यांची नोंदणी, वाहनाची वित्तदात्याचा बोजा उतरवणे इत्यादी वाहना संबंधी कामकाज होणार नाही. तसे न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार HSRP नंबर प्लेट विहित वेळेत न बसविण्यासाठी परिवहन विभागामार्फत दंड आकारणी करण्यात येईल. दंड टाळण्यासाठी विहित मुदतीत HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनाला HSRP बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हायसिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना HSRP बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची उत्पादकाची निवड करण्यात आली आहे.

वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. इतर कुठल्याही संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये, सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी 745 रुपये इतका दर आकारला जाणार असून याव्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे. सदर शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्यासाठी Appointment घेण्याची कार्यपद्धती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात 19 मे 2026 रोजी पर्यत एकूण 3 लाख 49 हजार 809 नोंदणीकृत वाहनांपैकी 1 लाख 67 हजार 760 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी करण्यात आली आहे. HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी प्रतिसाद वाढत असून वाहनधारकांनी वेळेत वाहनांना HSRP प्लेट बसवून घ्यावी. वाहनांना HSRP बसविण्याकरिता 30 जून 2026 रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्राबार कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन* १५ ऑगस्टपूर्वी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश*

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी कार्यक्रम उत्साहात“आपली सेवा, आमचे कर्तव्य” संकल्पाने पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास अभियानांत ठाणे जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक,दिनाचा दिमाखदार सोहळा**वैदिक मंत्रोच्चार, पालखी सोहळा, राजसदरावरील अभिषेक आणि शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने रायगड शिवमय…