vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा नागपुरात समारोप

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा नागपुरात समारोप

नागपूर प्रतिनिधी : भारतातील प्राचीन शिक्षण व्यवस्था अतिशय महान असून येथे तक्षशिला, नालंदा, विक्रमशिलासारखी विद्यापीठे अस्तित्वात होती. जगाच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी येत. हे प्राचीन ज्ञान एवढे वैशिष्ट्यपूर्ण होते की तेव्हाही भारत जागतिक व्यापार, जीडीपी व निर्यातीतही वर्चस्व गाजवत होता. वर्तमानात दिशादर्शक ठरणाऱ्या प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे ही येणाऱ्या पिढीची मोठी जबाबदारी व काळाचीही गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपीय समारंभात बोलत होते. मिहान येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(आयआयएम) येथे आयोजित या कार्यक्रमास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, माजी खासदार डॉ. नितीश भारद्वाज यांची विशेष उपस्थिती होती. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ.भीमराया मेत्री, द साऊथ पब्लिक स्कूलच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी दस्तुरे, सनफ्लॉवर व तायची पब्लिशिंगचे व्यवस्थापकीय संचालक राजेश घई, नवनीत प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष (एज्युकेशनल बुक्स डिव्हिजन) देविश गाला, द साऊथ पब्लिक स्कूलचे संचालक दिवेन दस्तुरे, न्यू सरस्वती हाऊसचे नॅशनल सेल्स हेडचे प्रमुख विरल उपाध्याय, एड्युव्हेटचे प्रमुख नुपूर मराठे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे सहयोगी संचालक रविशंकर रथ आदी यावेळी उपस्थित होते.प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीची महानता सांगताना श्री. फडणवीस यांनी आचार्य चाणक्य, पाणिनी या विद्वानांचे व त्यांच्या ग्रंथाचे दाखले दिले. ते म्हणाले, पूर्वी शिक्षणाची प्रणाली ‘शास्त्र’ व ‘संवाद’ रुपात होती. ज्ञान केवळ सैद्धांतिक नव्हते तर उपयोजित व कौशल्य-आधारित होते. त्यातूनच राष्ट्रीय, सामाजिक व वैयक्तिक विकास साधता येतो. ‘एआय’च्या युगात मानवी मूल्ये, नीतिमत्ता व चारित्र्य जपण्याची मोठी जबाबदारी नव्या पिढीवर असून आपल्या शिक्षण प्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांभोवतीच्या अनेक चर्चा आपण ऐकतो. या परिषदेने ‘जनरेशन वॉव’ (वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन) ही नवी संकल्पना मांडली असून ‘झेन झी’ किंवा ‘जेन अल्फा’पेक्षा ती निराळी आहे. ही पहिली पिढी आहे, जी माहितीच्या स्फोटासोबत जन्माला आली व तंत्रज्ञानाच्या स्फोटासोबत वाढत आहे. ‘मिलेनियल्स’ अशी पिढी आहे की ज्यांच्या आयुष्याचा नंतरचा भाग विकसित तंत्रज्ञानासोबत जात आहे. ‘जनरेशन वॉव’कडे प्रचंड प्रमाणात माहिती व अफाट उगमस्थाने आहे. त्याचे ज्ञानात रूपांतर करण्याची व त्याचा विचारपूर्वक वापर करण्याची दुहेरी जबाबदारी या पिढीवर आहे. ज्ञान हे त्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे शहाणपण आहे. त्या माहितीला एक नैतिक स्वरूप देणे, योग्य-अयोग्य ओळखणे व संवेदनशीलतेने तेआचरणात आणणे हेच आज खरे आव्हान आहे.सध्याच्या माहितीच्या स्फोटाच्या काळात वावरणाऱ्या पिढीला उपलब्ध माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे शहाणपण अंगी बाणवता आले पाहिजे. सध्याच्या काळात शिक्षक – अध्यापकांची भूमिका ही विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या विचार प्रक्रियेला योग्य तो आकार देण्याची असली पाहिजे. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी आवश्यक ती सखोल चर्चा व मंथन या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे ही परिषद महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

 

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी -भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या,  कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश…

मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!” हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

रायगड जि.प, पं.समिती सदस्यासाठी अलिबाग येथे कार्यशाळेचे आयोजन

जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड• राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारण विभागाच्या विविध विषयांचा आढावा

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर ६ ते ९ जूनदरम्यान पसंतीक्रम नोंदविण्याची संधी; १३ जूनला प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध होणार

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित