vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा- पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेऊ नये नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करा- पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधन तुटवड्याच्या अफवामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गर्दी होत असून अनावश्यक इंधन साठा जमा करताना दिसून येत आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याने नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या आणि पेट्रोल पंप धारकांच्या सतत संपर्कात आहे. पेट्रोल पंपांवर इंधनाचे वाटप सुरळीत व्हावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

  जिल्ह्यात आज (दि. 21 मे) विविध ऑईल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा झाला आहे. यामध्ये BPCL कडून 1 लाख 2 हजार 500 लिटर पेट्रोल आणि 3 लाख 5 हजार 500 लिटर डिझेल, HPCL कडून 1 लाख 5 हजार लिटर पेट्रोल आणि 3 लाख 74 हजार लिटर डिझेल, तर IOCL कडून 6 लाख 80 हजार लिटर पेट्रोल आणि 7 लाख 25 हजार लिटर डिझेलचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 8 लाख 87 हजार 500 लिटर पेट्रोल आणि 14 लाख 4 हजार 500 लिटर डिझेल उपलब्ध असून दररोज नव्याने इंधनसाठा प्राप्त होत आहे.

 गॅस सिलेंडरबाबतही जिल्ह्यात कोणतीही कमतरता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे नियमित 4 लाख 63 हजार 494 ग्राहक असून उज्वला योजनेंतर्गत 2 लाख 5 हजार 715 ग्राहकांना सेवा दिली जात आहे. दररोज सुमारे 7 हजार 950 गॅस सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून 16 हजार 448 सिलेंडरचा साठा राखीव आहे. कंपन्यांकडून दररोज याच पद्धतीने इंधनाचा पुरवठा होणार असल्याचे पुरवठा शाखेने सांगितले आहे.

  शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढे इंधन उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी इंधनाचे साठेबाजी करू नये तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प-निवृत्त EX INS Guldar ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष- गृहराज्यमंत्री योगेश कदम

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक,रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करा…

vishwatmaklokswamivarta

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने