vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन

युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी प्रत्येक वर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षाकरिता “Unmasking the appeal – Countering nicotine and tobacco addiction” ही थीम घोषित केली आहे. तरूण युवा पिढीने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी सन 2017-18 पासून सांगली जिल्ह्यामध्ये सुरु आहे. या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन करण्याकरिता एकूण 9 आरोग्य संस्थांमध्ये तंबाखू मुक्ती समपुदेशन केंद्र कार्यरत असून समुपदेशन केंद्रामध्ये आरोग्य संस्थेमध्ये येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व इतर तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात येते. सन 2025-2026 मध्ये एकूण 2361 इतक्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले आहे.

 शालेय स्तरावर विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकरिता जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तंबाखूमुक्त शाळेकरिताचे निकष पूर्ण करुन शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात येते. सांगली जिल्ह्यामधील शाळा जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व सलाम मुंबई फौंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने तंबाखू मुक्त घोषित करण्यात आलेल्या आहेत दिनांक 31 मे तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये पोस्टर स्पर्धांचे आयोजन करुन “Unmasking the appeal – Countering nicotine and tobacco addiction” या थीमच्या जनजागृतीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादन कायदा 2003 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यामधील आरोग्य विभाग, पोलिस विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन यांचे संयुक्त अंमलबजावणी पथक स्थापन करण्यात आले असून या पथकामार्फत पान शॉप, सार्वजनिक ठिकाणी व शालेय परिसरात छापे टाकून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात येतो. सन 2025-2026 मध्ये 9 हजार 400 रूपये इतक्या दंडाची वसुली अंमलबजावणी पथकामार्फत करण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कोकण मंडळाने नवीन वर्षात घरकुल योजना- दोन हजार हून अधिक सदनिकांसाठी भव्य गृहनिर्माण सोडत 

vishwatmaklokswamivarta

कर्मांचा न्याय अटळ; आत्मपरीक्षण व धर्माचरणातूनच मोक्षप्राप्ती : महासती श्री निर्मलाजी म.सा.

पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सिंदूरचा समग्र राजकीय-लष्करी उद्देश पाकिस्तानला छुपे युद्ध लढल्याबद्दल शिक्षा करणे हा होता; पाक-पुरस्कृत दहशतवाद ही एक सुनियोजित रणनीती आहे : लोकसभेत संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

इग्नाईट-२०२६’मधून मुंबईच्या निर्यातक्षम उद्योगांना प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta