vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देशभरातील 83 शहरांमधील 2,072 केंद्रांवर नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 चे आयोजन

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देशभरातील 83 शहरांमधील 2,072 केंद्रांवर नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 चे आयोजन

नवी दिल्ली प्रतिनिधी-केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज, म्हणजेच 24 मे 2026 रोजी, भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2026 सह नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 देशभरातील 83 परीक्षा केंद्रांमधील 2,072 परीक्षा स्थळांवर आयोजित केली. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या एकूण 8,19,732 उमेदवारांपैकी सुमारे 5.49 लाख उमेदवार, म्हणजेच जवळपास 67 टक्के उमेदवार परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित राहिले, अशी प्राथमिक माहिती आहे.

यंदा आयोगाने बनावट उमेदवारीला आळा घालण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अधिक वाढवण्यासाठी प्रथमच परीक्षा केंद्रांवर उमेदवारांचे प्रत्यक्ष चेहरा प्रमाणीकरण सुरू केले. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-शासन विभागामार्फत (एनइजीडी) स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेली ही प्रणाली सर्व 2,072 स्थळांवर यशस्वीपणे कार्यान्वित झाली. यूपीएससी कडून आयोजित करण्यात आलेल्या प्रत्यक्ष चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियांमधील ही कदाचित सर्वात मोठी मोहीम होती आणि याचे 100 टक्के यश आयोगाच्या पारदर्शकता आणि विश्वासार्हता प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.

उमेदवारांच्या सोयीसाठी सर्व परीक्षा स्थळांवर आवश्यक सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. परीक्षा सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर प्रशिक्षित पर्यवेक्षक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्तीही सुनिश्चित करण्यात आली होती. परीक्षा निष्पक्ष आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सर्व परीक्षा स्थळांवर मोबाइल सिग्नल जॅमर्सची व्यवस्था करण्यात आली होती.

परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून, यूपीएससी प्रथमच परीक्षा पूर्ण झाल्यानंतर लवकरच तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करणार आहे. आयोग प्रारंभी तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करेल आणि उमेदवारांकडून काही हरकती असल्यास त्या परीक्षा दिनांकापासून सातव्या दिवसाच्या संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत, म्हणजेच 31 मे 2026 पर्यंत स्वीकारल्या जातील.

तथापि, अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या विद्यमान पद्धतीनुसार नागरी सेवा परीक्षा-2026 चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रसिद्ध करण्यात येईल.

संबंधित पोस्ट

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय एफपीओ बैठक 2025 चे

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांसाठीव्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाचे उद्घाटन

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्वतयारी प्रशिक्षणऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट—-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा