vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*  

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*

नागपूर/ मुंबई प्रतिनिधी: वेगळा विदर्भ झाल्यास महाराष्ट्र आणि विदर्भ असे दोन मुख्यमंत्री होतील व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल, त्यामुळे वेगळ्या विदर्भाला आमचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

ना. रामदास आठवले यांची राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल नागपूर येथील मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता वसंतराव नाईक स्मृती सभागृहात (वनामती) करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. हा सत्कार कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम अध्यक्षतेत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखाग, बाळू घरडे, श्रीराम काळे, नीलेश खांडेकर, विजय आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपुरातील मित्र परिवाराने केलेल्या या सत्काराचे महत्त्व असून यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे आहे, असे ना. रामदास आठवले म्हणाले, नागपूरच्या भुमीत डॉ. आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतल्यामुळे या शहराचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या नेहमीच्या खुमासदार शैलीत अनेक शीघ्र कविता सादर करीत उपस्थितांना मनमुराद हसवले.

00000

संबंधित पोस्ट

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्ष नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन बारामतीतील निवासस्थानी शोकसंवेदना व्यक्त केल्या

vishwatmaklokswamivarta

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

vishwatmaklokswamivarta

पोलीस अंमलदारांना गुन्हे तपास प्रशिक्षणामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- 471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपास प्रशिक्षणाची सांगता

vishwatmaklokswamivarta

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन