
*मतदार यादीत नाव कायम राहण्यासाठी एसआयआर कार्यक्रमांतर्गत मॅपींग करून घेणे अनिवार्य**मतदार याद्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन*
नवी मुंबई प्रतिनिधी- निवडणुकीच्या मतदार याद्या अद्ययावत तसेच अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special intensive Revision – SIR) कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत सन 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील मतदारांच्या नावाची सन 2002 मधील अंतिम मतदार यादीतील मतदारांच्या नावाशी ताळमेळ घालण्याची कार्यवाही (SIR Mapping) सुरु करण्यात आलेली आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) काय आहे ? * मतदारांनी आपले नाव विद्यामान 2024-25 च्या मतदार यादीत असल्याची खातरजमा करून घेणे व सन 2002 मधील मतदार यादीतील नावाशी पडताळणी व जुळवणी करून घेणे.* सन 2024-25 मधील ज्या मतदारांची वयपूर्तता नसल्याने 2002 च्या मतदार यादीत नाव समाविष्ट नव्हते अशा मतदारांनी त्यांच्या नावाचे मॅपींग त्यांचे आई-वडील व वडीलांकडील आजी-आजोबा यांचे सन 2002 च्या यादीतील नावाशी करून घेणे.* ज्यांची नावे सन 2002 च्या मतदार यादीत नाही त्यांचेकडून प्रत्यक्ष SIR दरम्यान जन्माचे पुरावे घेणे



