vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तासगाव व पलूस येथील शासकीय वसतिगृहाचा लाभ घेण्याचे आवाहन

तासगाव व पलूस येथील शासकीय वसतिगृहाचा लाभ घेण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह तासगांव व मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह पलूस येथे अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास, विशेष मागास, विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गात समांतर आरक्षणाने अनाथ व अपंग यांना प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार इयत्ता ८ वी, ११ वी, प्रथम वर्ष बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम., एम.ए., एम.एस्सी., एम.कॉम., आणि प्रथम वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश दिले जातात. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृह गृहपाल यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 वसतिगृहामध्ये मोफत निवास व भोजन व्यवस्था, निवास भत्ता, स्टेशनरी, सहल भत्ता इत्यादी सोयी सुविधा आहेत. अधिक माहितीसाठी मुलांचे शासकीय वसतिगृह तासगांव मो. क्र. 9545272892 व मुलींचे शासकीय वसतिगृह पलूस मो.क्र. 7083585633 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अल-निनोच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाच्या गावोगावी 13 हजार गाव बैठकांचे आयोजन 

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’साठीप्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ..

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीत दिला

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांचा ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

नेरळ येथे पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाची तत्पर कारवाई

लातुरात महा विधी सेवा शिबीर, शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,कायदेविषयक मदतीसोबतच शासनाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील-न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर• विविध शासकीय योजनांचे वितरण; जनजजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी• विविध योजनांविषयी भव्य प्रदर्शनी; लातूरकरांनी नोंदविला सहभाग