vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश…     

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश…

                                                                       नांदेड प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यात 27 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 10 जून 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली                                                                                                          जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 27 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 10 जून 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

                                                                                                                                   त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.0000

संबंधित पोस्ट

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

vishwatmaklokswamivarta

स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू. कवड यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने लोक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या तीर्थस्थळांवर गंगा नदीचे पवित्र पाणी आणण्यासाठी जातात.

दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग,विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी …

अधिकारी -‌ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ…