vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

नवी दिल्ली प्रतिनिधी-केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी ‘प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना’ (पीएम-अजय) च्या जलद आणि गुणात्मक अंमलबजावणीसाठी ‘पीएम-अजय ‘ पोर्टल आणि ‘पीएम-अजय’ मोबाईल ॲपचा प्रारंभ केला. कागदपत्रांवर आधारित कार्यप्रवाह आणि प्रक्रिया पद्धतीकडून, ‘रिअल-टाइम’ (प्रत्यक्ष वेळेत) आधारित चालणाऱ्या संपूर्णतः डिजिटल कार्यप्रणाली आणि प्रक्रिया पद्धतीकडे संक्रमण करणे असा नवीन अॅप तयार करण्‍यामागे मुख्य उद्देश आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग, अनुसूचित जाती समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘ पीएम-अजय ‘ अंतर्गत विविध कल्याणकारी उपक्रम राबवत आहे. ‘पीएम-अजय ‘ मोबाईल ॲपचा उद्देश योजनेशी संबंधित सेवांचा मोबाईल-आधारित प्रवेश उपलब्ध करून देणे; गावपातळीवरील ‘अंतिम टप्प्यातील’ नियोजन आणि अंमलबजावणी सुलभ करणे; क्षेत्रीय स्तरावरील देखरेख सुधारणे; ‘रिअल-टाइम’ म्हणजेच वास्तविक अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करणे; तसेच पारदर्शकता आणि डिजिटल प्रशासन अधिक बळकट करणे हा आहे.

क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षणे आणि ‘गाव विकास आराखडे’ तयार करण्यासारख्या कागदपत्रांवर आधारित कार्यप्रवाहाकडून डिजिटल मंचाकडे संक्रमण करण्यासाठी, एक ‘एकीकृत डिजिटल मंच’ म्हणून ‘ पीएम-अजय ‘ मोबाईल ॲपची संकल्पना असून, तिचा विकास करण्यात आला आहे. हे ॲप्लिकेशन कौशल्य विकास, रोजगार आणि शैक्षणिक योजनांशी संबंधित माहिती, देखरेख, अहवाल आणि लाभार्थी-केंद्रित सेवांचा अखंडित प्रवेश, एका वापरकर्ता-स्नेही मोबाईल इंटरफेसद्वारे उपलब्ध करून देते.या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये खालील प्रमुख घटकांचा समावेश करण्यात आला आहे:विद्यमान ‘पीएमएजीवाय’पोर्टलवरील ‘आदर्श ग्राम’घटक

पीएम-अजय ‘अंतर्गत ‘अनुदान-सहाय्य’घटक पीएम-अजय ‘अंतर्गत ‘वसतिगृह’घटक’अजय ‘ॲप हे कार्यक्षमता सुधारण्यासाठी,’रिअल-टाइम’ देखरेखीसाठी, पारदर्शकता वाढवण्यासाठी, जलद अहवाल सादर करण्यासाठी, उत्तम समन्वयासाठी आणि ‘डेस्कटॉप’-आधारित कामकाजावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एक प्रभावी डिजिटल साधन आहे. हे ॲप मंत्रालयाचे अधिकारी, राज्य आणि जिल्हा स्तरावरील प्राधिकारी, अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, तपासणी अधिकारी, वसतिगृह प्रशासक आणि क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

पीएम-अजय ‘पोर्टल हे ‘केंद्रीय नियंत्रण कक्ष’ म्हणून कार्य करणारे आहे. या पोर्टलद्वारे योजनेच्या विविध टप्प्यांशी जोडलेला निधी प्रवाह सुलभतेने हाताळता येतो.’आदर्श ग्राम’ घटकासाठी, हे पोर्टल राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्वसमावेशक ‘डॅशबोर्ड्स’ उपलब्ध करून देते. या डॅशबोर्ड्सच्या माध्यमातून, 10 विकास क्षेत्रांमधील 50 देखरेख-योग्य सामाजिक-आर्थिक निर्देशकांच्या आधारे,’आदर्श गावांच्या’ विकासावर लक्ष ठेवणे शक्य होते. ग्राम विकास आराखडा डिजिटल पद्धतीने मंजूर होताच, टप्प्यांशी निगडित देखरेखीची प्रक्रिया स्वयंचलित करून हे पोर्टल कामकाजात सुसूत्रता आणते. शिवाय, कौशल्य विकास आणि रोजगारविषयक ‘अनुदान-सहाय्य’ घटकासाठी, हे पोर्टल एक मध्यवर्ती नियोजन यंत्रणा आणि व्यवस्थापन माहिती प्रणाली (एमआयएस) म्हणून कार्य करते. ही एमआयएस प्रणाली राज्यभरातील माहिती एकत्रित करून, उपजीविकेच्या साधनांसाठी होणारा मोठ्या प्रमाणावरील आर्थिक खर्च आणि निधी वाटपाचा मागोवा घेण्याचे काम करते.हा उपक्रम योजनेच्या विविध घटकांमध्ये सुसूत्रता आणण्यास आणि योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करेल.

संबंधित पोस्ट

भारत माता की जय’च्या गजरात दुमदुमली कामठी नगरी – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर कामठीत तिरंगा यात्रा

सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा     – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए संस्थाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

राज्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा  इशारा; अनेक भागात गारपीट ..