vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनगणना 2027 अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट दिल्ली येथील पथकाकडून जालना जिल्ह्यातील जनगणनेच्या कामकाजाचे कौतुक….

जनगणना 2027 अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट दिल्ली येथील पथकाकडून जालना जिल्ह्यातील जनगणनेच्या कामकाजाचे कौतुक….

जालना प्रतिनिधी) : जनगणना 2027 अंतर्गत दि. 16 मे ते 14 जून, 2026 या कालावधीत महाराष्ट्रात घरसूचीकरण व घरगणना यादी (House Listing Operation) कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या जनगणना कार्यालयाचे अतिरिक्त महानिबंधक संजीव कुमार, आणि उपसंचालक (O.R.G.I) संदिप राय हे (दि. 26 मे) आजरोजी जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी जालना तालुक्यातील मौजे धारकल्याण, बदनापूर नगर पंचायत, बदनापूर तालुक्यातील मौजे शेलगाव, तसेच जालना शहर महानगर पालिकेच्या ह‌द्दीतील जांगडानगर (ढवळेश्वर) येथे प्रत्यक्ष भेटी देऊन सुरु असलेल्या जनगणनेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या जनगणना कक्षास भेट देऊन सर्व अधिकारी /कर्मचारी यांची बैठक घेवून जनगणनेच्या कामाबाबत महत्वाच्या सूचना देत मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरु असलेल्या जनगणनेच्या कामकाजाबाबत दिल्ली येथील पथकाने कौतुक करून समाधान व्यक्त.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 जाहीर त्याचे मुद्दे सादर…

vishwatmaklokswamivarta

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ व लोकर्पण

vishwatmaklokswamivarta

मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…

लातूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून दहा जणांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याचे पथक लवकरच दाखल होणार

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे आज 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta