vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर येथे आज 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन

लातूर येथे आज 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन

राज्य प्रतिनिधी-▪️सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश ▪️राज्यातील नामांकित कलाकारांचे सादरीकरण▪️सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजन

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 चा लोकसंगीत महोत्सव 9 ते 11 ऑगस्ट, 2025 या कालावधीत लातूर येथील दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात राज्यातील विविध गायक कलाकार व कलापथक आपली कला सादर करणार आहेत. शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी रामानंद उगले, श्रावणी महाजन, विनल देशमुख, कुणाल वराळे यांच्यासह सहकलाकार हे आपली कला सादर करणार आहेत, तर रविवार, 10 ऑगस्ट, 2025 रोजी चैतन्य कुलकर्णी, आसावरी बोधनकर, प्रतीक सोळसे, अनुष्का शिकतोडे यांच्यासह सहकलाकार हे आपली कला सादर करतील. या महोत्सवाचा समारोप सोमवार, 11 ऑगस्ट, 2025 रोजी होणार असून अपेक्षा घारे, राधा खुडे, अभिजित कोसंबी, गौरव पवार यांच्यासह सहकलाकार आपली कला सादर करणार आहेत.

हा लोकसंगीत महोत्सव सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण..ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…

आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

मेळघाट प्रादेशिक वनविभागाचा उपक्रमचिचाटी धबधब्याकडे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती सुरू; स्थानिक २० युवकांना मिळाला रोजगार…

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती…’जिल्हाधिकारी स्वामी यांचे महिला सक्षमीकरण कार्यशाळेत आवाहन

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची बैठक-जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे