vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शांतता समितीची बैठक;*बकरी ईद शांततेत व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन*

शांतता समितीची बैठक;*बकरी ईद शांततेत व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन*

 

बुलढाणा प्रतिनिधी: बकरी ईद (ईद-अल-अजहा) हा सण त्याग, बलिदान, सौहार्द आणि शांततेचा संदेश देणारा सण आहे. हा सण सर्वांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक अशा ७० हून अधिक ठिकाणावरून अधिकारी व शांतता समितीचे सदस्य दृक्श्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून जोडले गेले होते.

जिल्हाधिकारी डॉ. देवरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यापूर्वीच शांतता समितीच्या बैठका पार पडल्या असून, सर्व सदस्यांनी सण शांततेत साजरा करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण असून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तसेच तात्पुरत्या कत्तलखान्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी आपल्या परिवारासह हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा.

जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांनी सांगितले की, ईदच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे सज्ज आहे. प्रतिबंधित जनावरांची अवैध तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीमांवर आणि संवेदनशील ठिकाणी २४ तास कार्यरत राहणारे विशेष चेक नाके (तपासणी नाके) उभारण्यात आले आहेत. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी या नाक्यांवर अहोरात्र लक्ष ठेवून असतील. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर हालचाल किंवा सामाजिक शांतता भंग होण्याबाबत काहीही संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तांबे यांनी केले.

संबंधित पोस्ट

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन

उर्स सोहळ्याचे पावित्र्य व भाविकांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विशेष वृत्त :संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद· एम्बेड प्रकल्पास गडचिरोली जिल्ह्यात लक्षणीय यश

vishwatmaklokswamivarta

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’!

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा