vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रगणकांनी घेतले जनगणना विषयक प्रशिक्षण

प्रगणकांनी घेतले जनगणना विषयक प्रशिक्षण

 

       नवी मुंबई प्रतिनिधी    जनगणना 2027 चे काम नियोजनबध्द रितीने सुरू असून प्रगणकांव्दारे घरोघरी जाऊन गृहगणना केली जात आहे. या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे 150 हून अधिक प्रगणकांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण फिल्ड ट्रेनर यांच्यामार्फत उत्तम रितीने पार पडले. प्रशिक्षणानंतर एपीएमसी, सिडको तसेच शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी समाधान व्यक्त केले आणि जनगणनेचे काम करण्यास स्वेच्छेने स्वीकृती दर्शवली.

महाराष्ट्र राज्यामध्ये जनगणनेचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम दिनांक 16 मे पासून सुरू झाले आहे. हे काम दिनांक 14 जून पर्यंत सुरू असणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांना जनगणनेविषयक आपल्या घराची व कुटुंबाची सत्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.     आपल्या घरी येणारे प्रगणक हे शासकीय कर्मचारी असून या राष्ट्रीय कामामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यामुळे नागरिकांनी त्यांचे स्वागत करावे आणि त्यांना आवश्यक संपूर्ण माहिती पुरवावी. ही माहिती राष्ट्रीय नियोजनाप्रमाणेच त्या त्या क्षेत्रामध्ये शासकीय योजना राबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या क्षेत्रातील विकास कामे ही या आकडेवारीवर अवलंबून असतात याची नोंद घ्यावयाची आहे.

  तरी नागरिकांनी आपल्या घरी येणा-या प्रगणकाचे अधिकृत ओळखपत्र तपासून त्यांना आवश्यक माहिती पुरवावी आणि जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रमुख जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. #Census2027 #जनगणना2027 #Census

संबंधित पोस्ट

वीरबालदिवस निमित्त सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीरØ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षणØ अभिप्राय, सूचना अथवा निवेदन सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करूया -उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी..

vishwatmaklokswamivarta