vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल जनगणनेला वेग

महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल जनगणनेला वेग

अहिल्यानगर, प्रतिनिधी भारत सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेचे काम सध्या अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात वेगाने सुरू आहे. आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला अधिक गती मिळाली असून प्रशासन, पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी व प्रगणक यांच्या समन्वयातून जनगणनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यवेक्षक व प्रभाग अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या जनगणना कक्षात बैठक आयोजित करण्यात आली. जनगणना प्रक्रियेतील अचूकता, कामाचा वेग व डिजिटल प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जनगणना ही देशाच्या नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया असल्याने प्रत्येक नोंदीची अचूकता व वेळेचे नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कामात अधिक समन्वय व कार्यक्षमता राखण्याच्या सूचना देत त्यांनी २३ मे ते १४ जून या कालावधीतील पुढील कामाचा आराखडाही सादर केला.

साहाय्यक आयुक्त मेहेर लहारे यांनी पूर्ण झालेली गणनाघरे, प्रणालीमध्ये अद्ययावत झालेली माहिती, एचएलओ ॲपमधील अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. क्षेत्रीय कामातील तांत्रिक बाबींवरही त्यांनी सूचना दिल्या.डिजिटल प्रणाली अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे जनगणना विभाग प्रमुख राकेश कोतकर यांनी नमूद केले

बैठकीत विविध पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच नागरिकांशी संवादातील समस्या मांडल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रगणकांच्या कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आलाशहरातील सर्व प्रभागांतील पर्यवेक्षक व प्रभाग अधिकारी बैठकीस उपस्थित होते. डिजिटल जनगणना मोहिमेला प्रशासनाचे प्रभावी नियोजन व भक्कम पाठबळ मिळत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

#डिजिटलजनगणना

संबंधित पोस्ट

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे.अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

vishwatmaklokswamivarta

अग्निशमन सेवा दिनानिमित्त नमुंमपा अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

रेल्वेच्या विकास जालन्याचा विकास–भास्कर आंबेकर.

vishwatmaklokswamivarta