vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना;एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना;एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी : केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यांच्यांतर्गत एकूण 52 हजार 365 लाभार्थी केंद्र शासनाच्या NSAP पोर्टलवर नोंदणीकृत आहेत. परंतु त्यापैकी 5 हजार 137 लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित असल्याने योजनेचा लाभपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे लाभार्थ्यांनी NSAP पोर्टलवर तातडीने आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

डिसेंबर 2024 पर्यंत लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या अनुदानाचा हिस्सा (₹200/₹300/₹500) NSAP पोर्टलमार्फत तर राज्य शासनाचा हिस्सा (₹1300/₹1200/₹1100) तहसील कार्यालयामार्फत BDS प्रणालीने खात्यात जमा करण्यात येत होता. परंतु, जानेवारी 2025 पासून राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाच्या नव्या धोरणानुसार अनुदानाचा राज्य हिस्सा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डिबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा केला जात आहे. त्यामुळे, लाभार्थ्यांचे आधार NSAP पोर्टलवर व्हेरिफाय होणे अत्यावश्यक आहे. यासाठी आधारमध्ये अद्ययावत माहिती आणि मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील 5 हजार 137 लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन प्रलंबित आहे. त्यामुळे, लाभ बंद होण्यापूर्वी त्वरीत आधार व्हेरिफिकेशन करुन घ्यावी. तसेच आपले नाव यादी असल्याची खात्री करावी. आपले नाव यादीत असल्यास आधार कार्ड अद्ययावत करावे, मोबाईल नंबर लिंक करावा, संबंधित तहसील कार्यालयात आधार सादर करून NSAP पोर्टलवर व्हेरिफिकेशन करून घ्यावे. आधार व्हेरिफिकेशन न केल्यास आपला लाभ थांबविण्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत संपूर्ण जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

नव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कामगार भवनचे भूमिपूजन

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन

कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी 862 कोटी 29 लाख रूपयांची तरतूद

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !वारकरी महाअधिवेशनात निर्धार : तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत; धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी!

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील धुळेकरांनी केले गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत