vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे कठोर धोरण आहे. या कायद्याच्या व्यापक प्रसार, प्रचार व अंमलबजावणीत राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करून समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारली जावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

आरोग्य भवन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य तपासणी व संनियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, प्रधान सचिव निपुण विनायक, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक (विलटो) डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक डॉ. वैशाली बडधे व समितीचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री आबिटकर म्हणाले, पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व संबधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय निर्माण करून त्याचा उपयोग मूळ उद्देश साध्य करण्यासाठी करावा, यासाठी स्वतंत्र ‘डेडिकेटेड टीम’ आणि ‘डेडिकेटेड यंत्रणा’ नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.यासाठी ठरविलेली कार्यपद्धती प्रभावीपणे राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री अबिटकर म्हणाले, समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रात वेळ देऊन या मोहिमेत सहभागी झाल्यास या कामाला वेग येईल. यासाठी सर्वांनी जबाबदारीने योगदान द्यावे. समिती सदस्यांनी सुचवलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

 

००००

संबंधित पोस्ट

मौजे सिरसवाडी येथील असंख्य युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…

🌱पुस्तोला क्लस्टरमध्ये एकात्मिक शेती पद्धतीसाठी नाबार्डकडून ४.४७ कोटींचा प्रकल्प मंजूर 🌱💰मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आदिवासी भागात शाश्वत उपजीविकेला चालना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली पाहणी

मुंबईतील नागरिक कामे पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ*मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम*

विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातूनसौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस