
धारावीतील रहिवाशांना डॉक्टर , समाजसेवक यांनी जीवाची पर्वा न करता मदत,अशा या योद्ध्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला होता त्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान,धारावी सहकारी पतपेढी तर्फे करण्यात आला
धारावी प्रतिनिधी
धारावी : धारावी सहकारी पतपेढीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान काल धारावी कोळी जमात सभागृहात करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात धारावीतील रहिवाशांना डॉक्टर , समाजसेवक यांनी जीवाची पर्वा न करता मदत केली होती. अशा या योद्ध्यांच्या सेवेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला होता. त्यांचा सन्मान करण्यात आला,
याबाबतची थोडक्यात माहिती,
कोरोना महामारी काळात (लॉक डाऊन )च्या दरम्यान गणेश परशुराम सोनवणे शिवसेनेचे उप शाखा प्रमुख वॉर्ड क्र 186 यांनी अतिशय तन्मयतेने व सेवानिवृत्तने धारावीतील तमाम नागरिकांना सर्व प्रकारची मदत केली आहे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून धारावी सहकारी पतपेढी मर्यादित तर्फे सत्कार करण्यात आला आणि धारावीतील इतर कोरोना योद्ध्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. अनिल पाचणेकर, डॉ. संदीप शिंदे, डॉ. मंगेश खाडे, डॉ. विद्या गजकोश, डॉ. संदेश जाधव, डॉ. अवनी वाळके, डॉ. दिनेश त्रिपाठी, समाजसेवक गणेश सोनवणे, प्रशांत व्हटकर यांचा समावेश होता. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक व डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मराठे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी धारावी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष ॲड. प्रदीप कदम, शिवलिंग व्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.



