vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी-मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यानी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

प्रसारभारती समवेत झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे. संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी व आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे.

#Maharashtra

#PrasarBharati See less

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीराचा शुभारंभ…

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वारणा धरणात 28.34 टी.एम.सी. पाणीसाठा

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रेडाई-एमसीएचआय आयोजित ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु