vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुण्यात गोळीबार झाल्याने एकच खळबळ; आरोपी ऊसात पळून गेले, पोलिसांकडून शोध सुरु

 पुण्यात गोळीबार झाल्याने एकच खळबळ; आरोपी ऊसात पळून गेले, पोलिसांकडून शोध सुरु

 

पुणे प्रतिनिधी: पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चारचाकी वाहन पार्किंग करताना झालेल्या वादातून हा गोळीबार करण्यात आला. यातील 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य 2 आरोपी ऊसात पळून गेले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टीमधील काही तरुण आणि पाटसच्या तरुणांमध्ये भर दुपारी उन्हात वाद झाला, या हाणामारीत गावठी पिस्तूलमधून 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर अन्य काही आरोपी ऊसात पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रिकामी काडतुसे जप्त केली आहेत.

मिळत असलेल्या माहितीनुसार, पाटस येथील गडदरे कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडली आहे. काष्टी येथील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण गडदडे कॉम्प्लेक्स समोर आले होते. त्यांची पाटस येथील काही तरुणांशी शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे हा वाद वाढत गेला, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटातील काही तरुणांनी गावठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यात 3 ते 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पाटस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातुन झाला ? कोणत्या पिस्तूलमधून फायर करण्यात आला आणि यामध्ये कोण जखमी झाले आहे का? याबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. यवत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट

एसटी महामंडळाचा ॲप- एसटी कुठपर्यंत पोहोचली, 15 ऑगस्टपासून आता मोबाईलवरच मिळणार जीपीएस लाइव्ह लोकेशन

मुंबईच्या दादर येथे आज ५ जाने.राणी दुर्गावती ५०० वी व अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षानिमित्त ‘मानवंदना संचलनात, ३ हजार तरुणीचा सहभागी होणार…

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत १६ विद्यार्थी व कुटुंबीयांना लाभ मंजूर

महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रोबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… वाट पाहतंय आपली … भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज पासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन