vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहिम;श्रमदानातून झाला परिसर स्वच्छ

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहिम;श्रमदानातून झाला परिसर स्वच्छ

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी ७ वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या दोन तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा हा म्हणता स्वच्छ झाला. यानिमित्ताने आज पुन्हा एकदा समुह शक्तीचा प्रत्यय जिल्हा प्रशासनाने आणून दिला.

आज भल्या सकाळी ७ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी अधिकारी जमा होऊ लागले. आदल्या दिवशीच शनिवारी (दि.६) स्वच्छता मोहिम राबवून कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत सर्व अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले.

स्वतः जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हातात झाडू घेऊन पुढे सरसावले. सर्व आवारात अधिकारी- कर्मचाऱ्यांनी गटागटाने भाग स्वच्छ करायला घेतला. वाढलेली झुडपे, गवत, जमा झालेला पाला पाचोळा, फेकलेल्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, निरुपयोगी साहित्य अशा एक ना अनेक जमा झालेल्या वस्तू काना-कोपऱ्यातून निघाल्या. हळू हळू प्रत्येक कोपऱ्यात कचऱ्याचे संकलन झाले. मग महापालिकेचे कचरा वाहतुक करणारी वाहने जमा झाली. एक दोन नव्हे तब्बल १२ वाहने भरुन कचरा जमा झाला. एकाच दिवसातल्या अवघ्या दोन तासाच्या श्रमदानाने चकाचक झालेले जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार पाहून सारे अधिकारी- कर्मचारी स्वतःच आश्चर्य व्यक्त करीत होते. या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) संगिता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर,उपजिल्हाधिकारी रुपेश सिंगारे, डॉ. निलेश अपार, एकनाथ बंगाळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिनेश झांपले, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान विभाग शरद दिवेकर तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी या मोहिमेत सहभागी झाले.

०००००

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक -रूपाली अंबुरे यांची मुलाखत

खामगाव शासकीय वसतिगृहासाठी पाणीपुरवठा निविदा आमंत्रित 

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढग फुटी भीषण पूरस्थिती अनेक अनेक मृत्युमुखी तर अनेकांचा शोध सुरू घटनास्थळी प्रशासन तत्परतेने काम चालूच

होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 🎉🚆भारतीय रेल्वे कडून-होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी खुशखबर 🎉

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध