मुंबईचे महापौर रितू तावडे यांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा इमेल- पालिका मुख्यालयात सुरक्षेत मोठी वाढ …
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर पुणे येथील पालिका मुख्यालयास बॉम्बने उडून देणार असल्याचा ईमेल आला होता त्यानंतर आता पुन्हा मुंबई महानगरपालिका टारगेट असल्याचे दिसून येत आहे यावेळी मात्र मुंबईचे महापौरांना गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून महापालिका मुख्यालयातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. महापौरांना गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून महापालिका मुख्यालयातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल प्राप्त होताच महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह सायबर सेलने या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर हाती घेतला आहे. ज्या आयपी अॅड्रेसवरून हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे, त्याचा तांत्रिक शोध घेतला जात आहे.
यापूर्वी पुणे महापालिकेपाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेतही धमकीचा मेल आल्याने राजकीय आणि पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची आणि त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात इसमाने थेट ई-मेल पाठवून महापौरांची अधिकृत गाडी आणि महापालिका मुख्यालयातील त्यांचे केबिन बॉम्बने उडवून देऊ असा उल्लेख केला आहे. या प्रकारानंतर मुंबई पोलीस आणि पालिकेची सुरक्षा यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे.