vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

 

नांदेड, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने जिल्हाभरातील विविध शाळांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जिल्हा परिषद हायस्कूल, विष्णुपुरी येथे भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान आरोग्यदूत म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बॅच व आरोग्यदूत पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड, विभागीय समन्वयक, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरीच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.

दरम्यान, विभागाचे शिक्षण उपसंचालक दिपक चवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी (म.), ता. अर्धापूर येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास तालुका गटशिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले, शिक्षण विस्तार अधिकारी निजाम शेख, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होतेजिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत आत्मीयता निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात झाली.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई सीएसटी येथे स्टेशनवर  गोंधळ, दोन लोकल अचानक आमने-सामने, मोटरमन ने रेल्वे थांबवली, थोडक्यात टळला अपघात रेल्वे सेवा विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ! जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना !१५५ मिली मीटरचे प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणार

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील परळ  येथील स्वामी संस्था विरंगुळा केंद्राला सदिच्छा भेट

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीचे दि.13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन