vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित  सुरक्षा मंत्र: आधुनिक जगात एक पाऊल पुढे कार्यशाळेस  विद्यार्थीनी व महिलांचा उत्स्फुत प्रतिसाद

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित

सुरक्षा मंत्र: आधुनिक जगात एक पाऊल पुढे कार्यशाळेस

विद्यार्थीनी व महिलांचा उत्स्फुत प्रतिसाद

जालना, प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिन (15 जुलै) निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना व जालना जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनी व महिलांसाठी सुरक्षा मंत्र: आधुनिक जगात एक पाऊल पुढे ही कार्यशाळा घेण्यात आली.

सदर कार्यशाळेचे उद्घाटक विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक जालना यांनी महिला सुरक्षेसाठी जालना पोलिस दलाकडून राबविले जाणारे उपक्रमाची माहिती दिली व आत्मस्वंरक्षणासाठी महिलांनी सेल्फ डिफेन्स शिकणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र, गणेश चिमणकर यांनी कौशल्य विकासाद्वारे आजच्या युवतींचे सक्षमीकरण करून सक्षम राष्ट्राची उभारणी करता येईल हा संदेश दिला. सदर कार्यशाळेत जालना जिल्ह्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयाच्या 90 विद्यार्थींनी व महिला यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे स्वसंरक्षणाची तंत्र आत्मसात केले. कार्यशाळेच्या समारोपात गीता नाकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती, यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल येवले, कौशल्य विकास अधिकारी,जालना, संजय सोनवणे, जालना पोलिस दल व दत्ता जाधव, कनिष्ठ‍ कौशल्य विकास अधिकारी तसेच डॉ अमोल परिहार, रविंद्र पडमुख, विशाल जगरवाल व दिपक पालवे यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य; अकोला जिल्ह्यातील ४३ खेळाडूंना शिष्यवृत्ती, २१ बॉक्सिंगपटूंची चमक

vishwatmaklokswamivarta

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”**महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न*

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा नामांकनासाठी स्किल कॉम्पीटीशन

vishwatmaklokswamivarta

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी; 25 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा क्रीडा संकुलमधील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत*  *पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद* 

vishwatmaklokswamivarta