vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशातील सर्वांत मोठ्या मुंबई  एअरपोर्टवर तुफान गर्दी  मोठ्या संख्येने जमाव आणि गोंधळाचं वातावरण..

देशातील सर्वांत मोठ्या मुंबई  एअरपोर्टवर तुफान गर्दी  मोठ्या संख्येने जमाव आणि गोंधळाचं वातावरण…?

मुंबई प्रतिनिधी  : देशातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वाच्या एअरपोर्टपैकी मुंबई एअरपोर्ट एक आहे. मुंबई एअरपोर्टवर तुफान गर्दी पहायला मिळाली. मोठ्या संख्येने जमाव आणि गोंधळाचं वातावरण पहायला मिळालं. प्रवाशांनी आपली फ्लाईट मिस करायला मोठी गर्दी हाताळू न शकलेल्या यंत्रणेला जबाबदार ठरवलं आहे. मोठ्या संख्येने प्रवासी लांबच लांब रांगांमध्ये अडकून राहिल्याचं चित्र होतं. डोमेस्टीक एअरलाईन्स कंपनी इंडिगोने प्रवाशांना सुरक्षेच्या तपासासाठी आवश्यक वेळ मिळण्यासाठी लकवर रिपोर्ट करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही फ्लाईट्स उशीरा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एअरपोर्टवरील एका अधिकाऱ्याने सांगितलंय की, सण-समारंभांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. एअरपोर्टवर अतिरिक्त सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आलं आहे. आम्ही आमच्या सुरक्षेमध्ये कसलीही कसर सोडू इच्छित नाहीये. सुरक्षा तपासणीमुळे ही गर्दी वाढली आहे. आम्ही लवकरच एक वक्तव्य प्रसिद्ध करु.

नाराज प्रवाशांनी सोशल मीडियावर मात्र आपला संताप व्यक्त करुन दाखवला आहे. गायक विशाल दादलानीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, मुंबई एअरपोर्टवर सध्या गोंधळांचं वातावरण आहे. असं वाटतंय की आम्ही मागच्या कोणत्यातरी युगात आहोत. लोकांची भरमसाठ गर्दी आहे. मशीन्स काम करु शकत नाहीयेत. सगळीकडे अव्यवस्था दिसून येत आहे. कर्मचारी आपल्या परिने योग्यरितीने काम करत आहेत मात्र तरीही ते गर्दीला नियंत्रित करु शकत नाहीयेत. ही अव्यवस्था कशामुळे पसरलीये, कृपया त्यांना टॅग करा.

संबंधित पोस्ट

जम्मू कश्मीरच्या भद्रवाह – चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात करुणा प्रादुर्भावामुळे बंदी असलेले सन शासनाने घातलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे तुंबलेला उत्साह यात्रेतून पुन्हा सळसळू लागले

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

गणपती बाप्पा मोरया ,हेलिकॉप्टरद्वारा अष्टविनायक दर्शन सेवा सुरू; इथे पहा कुठे कराल बुकिंग

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तान ने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

🇮🇳 आयर्नमॅन ७०.३ गोवा २०२५ मध्ये भारतीय वायुदलाची झळाळती कामगिरी!११ वैयक्तिक सहभागी (२ महिला अधिकाऱ्यांसह) आणि ३ रिले संघांनी भारतीय वायुदलाचं प्रतिनिधित्व केलं — रिले स्पर्धेत सर्व तीन पोडियम स्थान जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली.

vishwatmaklokswamivarta