
गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील *मोतीलाल नगर क्रमांक १,२ व ३* च्या पुनर्विकासाबाबत*आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर* यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवाशांसोबत चर्चा सत्राचे आयोजन
मुंबई प्रतिनिधी गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील *मोतीलाल नगर क्रमांक १,२ व ३* च्या पुनर्विकासाबाबत आज *आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर* यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवाशांसोबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रहिवाशांसोबत संवाद साधताना *आमदार महोदयांनी* आपण काल,आज आणि उद्या कायम रहिवाशांसोबत आहोत आणि त्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत तसेच गेली ४ वर्षे आपण १६०० फुटाच्या घराची करत असलेली मागणी आता म्हाडाने मान्य केली आहे असे सांगितले. यावेळी *महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर,नगरसेवक संदीप पटेल, सुशील चव्हाण, विजय गायकवाड, बलवंत वर्मा,अमेय मोरे,मिलिंद वाडेकर,राजन कांबळी,किशोर ठाकुर* आदी उपस्थित होते.



