vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

क्रांती चौक ते जिल्हा परिषद मैदान ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’शुक्रवारी (दि.21) आयोजन, नागरिकांना सहभागाचे आवाहन

क्रांती चौक ते जिल्हा परिषद मैदान ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’शुक्रवारी (दि.21) आयोजन, नागरिकांना सहभागाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी शुक्रवार, दि.21 रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 शुक्रवार दि. 21 रोजी सकाळी 6 वा. क्रांती चौक येथून वॉकेथॉनला प्रारंभ होऊन जिल्हा परिषद मैदान येथे समारोप होईल, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग यांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 21 ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने दि. 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ तसेच दि. 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. माती व पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि जलसंवर्धनाला व्यापक लोकसहभाग मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. राज्यभर दि. 21 रोजी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात वॉकेथॉनचा मार्ग क्रांती चौक – पैठण गेट – तिलकपथ रोड मार्गे डावीकडे – पोलीस चौकी – गुलमंडी – जिल्हा परिषद मैदान असा निश्चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिक, शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी वॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली.

अल निनो : संकटाचा सामना शेतकऱ्यांची सतर्कता आवश्यक 

कैलासनगर स्मशानभूमीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन; वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ॲक्शन मोडवर; जलसंधारणाच्या कामांच्या पाहणीसोबतच विविध यंत्रणांचा आढावा *मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देवून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड*▪️ जिल्हास्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याच्या सूचना▪️जिल्हास्तरीय यंत्रणांकडून कामांचा आढावा

मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक कराअन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन