
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पद नाकारल्याची कबुली राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील दिली
सातार प्रतिनिधी : गृहमंत्री पद का नाकारलं? याचा खुलासा जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना केला. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याकडून घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्साही सांगितला.
गृहमंत्री पदाबाबत जयंत पाटलांनी सांगितला किस्सा2009 साली आर. आर. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचंय, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतंय? हे आर. आर. पाटलांना विचारलं. त्यावेळी आबांनी मला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर आर. आर. पाटलांनी मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असे मिश्कीलपणे म्हंटले. मला त्या काळात ब्लड प्रेशरचा त्रास सुरु देखील झाला. याशिवाय त्यावेळी माझ्या खाजगी सचिवाला त्रास सुरु झाला होता. गृहमंत्री झालो आणि तेव्हापासून ब्लड प्रेशरचा त्रास मागे लागला. पण आता डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नाही, असं माझं मत तयार झालं होतं, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.



