vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

अकोला केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

अकोला केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार…

अकोला प्रतिनिधी  : केंद्र सरकारच्या शेतकरी व सर्वसामान्याच्याप्रती असलेल्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी रास्तारोको, मोटरसायकल तिरडी, धरणे व निषेध रॅलीव्दारे आक्रोश व्यक्त झाला. वाशीम येथे अकोला नाका चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शुभदा नायक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळेस प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.मंगरुळपीर : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी प्रणित भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत विक्रमी दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनता या महागाईने होरपळल्याचा आरोप करीत, वाढत्या महागाईच्या निषेधार्थ बुधवारी (ता.२०) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती.

केंद्र शासनाने त्वरित पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्यावी. सर्वसामान्य जनतेचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केंद्र सरकारला निवेदनाद्वारे दिला आहे. कोरोनासह विविध संकटांमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला असून, निसर्गानेही त्याच्यावर अवकृपा दाखवली आहे. वाशीम जिल्ह्यासह मंगरुळपीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे व परतीचा पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. नुकसान भरपाईच्या अनुषंगाने राज्य सरकारने सांगून सुद्धा महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नुकसानिचे पंचनामे अजूनपर्यंत केले नाहीत.

 

संबंधित पोस्ट

विरोधक एकत्र येऊ शकत नाहीत हा भाजपचा भ्रम आता तुटणार, खासदार संजय राऊत ठाकरे गट

vishwatmaklokswamivarta

नंदुरबारचे पालकत्व अजित पवार गटाकडे; विजयकुमार गावितांना बाजूला करून अनिल पाटलांना …  

सध्याचे सरकार ठोस उपाययोजना करायला तयार नाही, शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी 

vishwatmaklokswamivarta

सुजात आंबेडकर यांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान, ‘दंगल पेटवायची असल्यास प्रथम स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवा’…

शारीरिक हालचाल थांबलेली पाहून पक्षविरोधी कारवाया सुरु झाल्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना ‘हिंदू ओवेसी’ म्हटल्यावर असदुद्दीन ओवेसीचा संजय राऊतांना सल्ला

vishwatmaklokswamivarta