vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

नंदुरबारचे पालकत्व अजित पवार गटाकडे; विजयकुमार गावितांना बाजूला करून अनिल पाटलांना …  

नंदुरबारचे पालकत्व अजित पवार गटाकडे; विजयकुमार गावितांना बाजूला करून अनिल पाटलांना …

 

 आज राज्यातील बारा जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली. त्यानुसार अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले तर अनेकांना सोन्याहून पिवळे झाल्याचे वाटत आहे. दुसरीकडे अजितदादांनी शेवटी एंट्री करूनही पुण्यावर ताबा मिळवला असल्याची चर्चा आहे

.  सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद बहाल केले. नंदुरबारमध्ये  गेल्या दोन पंचवार्षिक भाजपचा पालकमंत्री असताना आता मात्र अमळनेरच्या आमदार अनिल पाटील यांच्यावर नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने एकप्रकारे राष्ट्रवादीने भाजपवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. 

राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार   यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून शिंदे फडणवीस   उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांची मंत्रिपदावर वर्णी लावली.

यामुळे तेव्हापासूनच शिंदे गटाची धाकधूक वाढल्याचे चित्र होते. त्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नव्हता. दुसरीकडे काल दिवसभर अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आज राज्य सरकारने बारा जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली, यातही राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून आल्याने शिंदे गटासह भाजपच्या गोटात खळबळ उडाली. विशेष म्हणजे ज्या नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन पंचवार्षिक भाजपचा  पालकमंत्री असताना दादांनी तिथंही आपला पत्ता गिरवल्याचे जाहीर यादीतून समोर आले आहे. 

संबंधित पोस्ट

उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातपाठोपाठ आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलणार?; चर्चांना उधान 

vishwatmaklokswamivarta

वसई पश्चिमेला गॅस पाईप लाईनचे भुमीपुजन केव्हा :असा प्रश्न माजी आमदाराने,आमदार हितेंद्र ठाकूर विचारल्याने खळबळ 

vishwatmaklokswamivarta

आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,आता मशाल चिन्हही जाणार? 

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद निवडणूक : दहा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात

मराठा आरक्षण, एक देश एक निवडणूक, जालना लाठीचार्ज या मुद्द्यांवर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष नेते शरद पवार

vishwatmaklokswamivarta

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची स्पष्ट भूमिका जाहीर-मराठा दलित मुस्लिम यांची युतीचा प्रयत्न..

vishwatmaklokswamivarta