vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

२०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’; १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याचे लक्ष्य२०२७ पासून जुन्या बसेसचे ई-बसमध्ये रूपांतर· चार्जिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

२०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’; १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याचे लक्ष्य२०२७ पासून जुन्या बसेसचे ई-बसमध्ये रूपांतर· चार्जिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा ताफा २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे ५ हजार डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटीच्या मुख्यालयात झालेल्या ३१२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य आणि महामंडळाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस असून, त्यापैकी ११०० बसेस ई-बसेस आहेत. ताफ्यातील सुमारे ५ हजार जुन्या बसेस नियमानुसार टप्प्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्यामुळे ताफ्याचे आधुनिकीकरण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे.

२०२७ पासून ई-बसमध्ये रूपांतर,सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या बसेसचे २०२७ पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई-बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाणार आहे.

सध्या डिझेल बसेसचे आयुर्मान सुमारे १५ वर्षे, तर ई-बसेसचे आयुर्मान सुमारे २० वर्षे असल्याने इलेक्ट्रिक बसेसचा अधिक काळ वापर करता येणार आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे इंधन खर्चातही बचत होण्याची अपेक्षा आहे.चार्जिंग स्टेशनची उभारणी समांतरपणे,ई-बसेसच्या वाढत्या संख्येला आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन, विद्युत पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आगारनिहाय नियोजन करून ई-बसेसची खरेदी आणि चार्जिंग सुविधा उभारणी या दोन्ही प्रक्रिया समांतरपणे राबविण्यात येणार आहेत.

“एसटी ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाला जोडणारी सार्वजनिक सेवा आहे. तिचे आधुनिकीकरण करताना पर्यावरणाची जबाबदारीही महत्वाची आहे. डिझेलवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचा आमचा संकल्प आहे. २०३७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा इलेक्ट्रिक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी भविष्यात हरित महाराष्ट्राची ‘ई-लालपरी’ बनेल. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचे देशातील आदर्श मॉडेल महाराष्ट्रात उभारण्याच्या दिशेने एसटीची वाटचाल सुरू आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

0000

 

संबंधित पोस्ट

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान-माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स पुरस्कार कडेपूर ग्रामपंचायतीला प्रदान- जयपूर येथे भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण 

vishwatmaklokswamivarta

कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन : ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

vishwatmaklokswamivarta

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा-किर्लोस्कर करणार पाणलोट विकास16 कोटी निधीतून 6167 हेक्टरवर जलसंधारण,11 हजारांहून अधिक ग्रामस्थांना होणार फायदा

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

रस्ता सुरक्षा अभियान संयमाने वाहन चालविणे हीच खरी हिरोगिरी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta