vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिवरापहाडीच्या चिमुकल्यांच्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दखल· दुर्गम भागातील शाळेत शिक्षक रुजू· “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” मुलींच्या ‘त्या’ हाकेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलली· जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तात्काळ पाऊल; शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती

हिवरापहाडीच्या चिमुकल्यांच्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दखल· दुर्गम भागातील शाळेत शिक्षक रुजू· “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” मुलींच्या ‘त्या’ हाकेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलली· जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तात्काळ पाऊल; शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती

मुंबई, प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरापहाडी (केंद्र जरूड) ता. बीड येथील चिमुकल्या विद्यार्थिनींच्या ‘बॉटल माईक’ सोशल मीडिया रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने दखल घेतली आहे. “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” अशी हाक मारणाऱ्या या मुलींना त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभाग तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती करण्यात आली.

विद्यार्थिनींच्या आंदोलनाची दखल,हिवरापहाडी येथील दुर्गम भागातील शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. यावर तोडगा काढण्यासाठी येथील चिमुकल्या मुलींनी पाणी पिण्याच्या प्लास्टिक बॉटलचा माईक बनवून थेट वर्गातूनच अभिरुप बातमीपत्र सादर केले होते. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाकडून शिक्षक रुजू,वरिष्ठ स्तरावरून थेट आदेश झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ पावले उचलत शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती करण्याचा आदेश केला. त्या आदेशानुसार ते हिवरापहाडी शाळेत रुजू झाले आहेत.

००००

 

 

 

संबंधित पोस्ट

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे रविवार २८ जून रोजी ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

गोवा बनावटीची अवैध दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्त्यांची पाहणी

संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज – मंत्री ॲड.आशिष शेलार पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ३ दिवसीय व्याख्यानमाला

vishwatmaklokswamivarta