vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा”गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा”गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पोलीस यंत्रणेला सूचना

नागपूर प्रतिनिधी  : अमली पदार्थाच्या विळख्यात सापडून तरुणाई उद्ध्वस्त होऊ शकते. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी आता नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे, अशी सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी  पोलीस  दलाला केली.

येथील पोलीस निवासस्थानाचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत आदी उपस्थित होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटनही त्यांनी केले.

सध्या अमली पदार्थाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. त्याला स्पर्श करताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी अमली पदार्थ आणि दुष्परिणामाचे सांकेतिक विश्लेषण केले. दहशतवाद आणि नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागेल. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या अवती-भवतीही  नजर रोखावी लागेल, असे ते म्हणाले.

पोलिसांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी १२ हजार पोलिसांच्या भरतीचे उद्दीष्ट सरकार समोर असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांच्या हत्येला मनसेचा पाठिंंबा आहे का?; राष्ट्रवादीचा रोकडा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक 

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेची २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध, नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय : यंदा प्रथमच ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास मिळणार १०% अर्ली बर्ड सवलत; तसेच बिल वाटपासाठी बचत गटांच्या महिलांचा सहभाग

जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविणार-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

२०२४ च्या ८.४४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची परतफेड

vishwatmaklokswamivarta

माता काली ही माझ्यासाठी मांस व मद्य ग्रहण करणारी देवी आहे,’ असे विधान करून TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून सुरू झालेल्या वादात उडी,यामुळे देशभरात हिंदू संतप्त..