vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिवाळीसाठी यंदा शुगर फ्री, फटाका चॉकलेटला पसंती…

दिवाळीसाठी यंदा शुगर फ्री, फटाका चॉकलेटला पसंती…

मुंबई  : प्रतिनिधी  दिवाळीसाठी दुकानांमध्ये नाना प्रकारची मिठाई, बर्फी उपलब्‍ध असली, तरी त्‍यांचे भाव गगनाला भिडल्‍याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. शिवाय मावा, दूध, मलईचे पदार्थ ठराविक मुदतीत संपवणे गरजेचे असल्‍याने मिठाईला पर्याय म्‍हणून चॉकलेट खरेदीला, भेटवस्‍तू म्‍हणून देण्याला ग्राहकांकडून पसंती दर्शवली जात आहे. यात यंदा शुगर फ्री, फटाका चॉकलेटची मागणी वाढली आहे.

बाजारात मिठाई घ्‍यायला गेलात, तर ५०० ते १५०० रुपये किलो दराने उपलब्‍ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे १०० ते २०० रुपये भाववाढ झाली आहे. सफेद/दुधाचा पेढा ५०० रुपये किलो, केसर, मलाई पेढा ६०० रुपये किलो, बर्फीचेही दर वाढले असून पिस्ता, मलाई बर्फी ६०० रुपये किलोपर्यंत आहे. काजूकतली ८०० रुपये किलो आहे. त्यामुळे दिवाळीत येणाऱ्या पै-पाहुण्यांचे तोंड गोड कसे करावे, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.आरोग्‍याचा विचार करता, अनेकांकडून मिठाई खाणे टाळले जाते; मात्र चॉकलेट दिल्‍यास आबालवृद्धांच्या पसंतीत उतरते. कॉर्पोरेट संस्कृतीबरोबरच कौटुंबिक स्‍तरावरही भेटवस्‍तू म्‍हणून चॉकलेट देण्याकडे अनेकांचा वाढला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये विविध फ्लेवरचे, आकर्षक रॅपर असलेल्‍या चॉकलेटच्या भेटवस्‍तू ग्राहकांना भुरळ घालत आहेत.

विविध फ्लेवर्ससह आकर्षक आवरणविविध आकाराच्या खोक्यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात ही चॉकलेट आकर्षकरीत्‍या पॅक करून दिली जातात. काही बेकरी उत्‍पादक, बचत गटांच्या माध्यमातूनही यंदा मोठ्या प्रमाणात चॉकलेट बनवण्यात आली आहेत. रंगीबेरंगी झगमगीत कागदात गुंडाळून ही चॉकलेट लहान मोठ्या आकर्षक, विविध आकाराच्या खोक्यांमध्ये भरली जात आहेत. प्लेन चॉकलेट, ॲनिमल, बटरफ्लाय, लव्ह, ट्रायअँगल, स्टार आदी आकारांत विविध फ्लेवरची चॉकलेट सध्या बाजारात उपलब्ध आहेत.प्रियजनांसाठी चॉकलेट बुकेप्रत्येक जण चॉकलेट खाऊ शकतोच, असे नाही. अशा व्यक्‍तींसाठी बिनदुधाची आणि वजन न वाढवणारी डाएट चॉकलेट, शुगर-फ्री चॉकलेट उपलब्‍ध आहेत. जवळच्या व्यक्‍तीला भेट देण्यासाठी चॉकलेट बुकेही मिळताहेत. डार्क, मिल्क, व्हाईट, कॅरेमल हे चॉकलेटचे विविध फ्लेवर दुकानांत, मॉलमध्ये उपलब्ध आहेत; तर अनेक गृहिणींकडून खास दिवाळीसाठी बुकिंग घेऊन हव्या त्या आकारात, पॅकिंगमध्ये चॉकलेट तयार करून दिली जात आहेत.फटाका चॉकलेटप्रदूषणात वाढ होत असल्‍याने फटाके न फोडण्याबाबत सध्या जनजागृती होत आहे. अशा व्यक्‍तींना फटाका चॉकलेट खरेदी करून आपली हौस भागवता येणार आहे. रॉकेट, पाऊस, लक्ष्मी बॉम्ब, लवंगी बार आदी प्रकारात ही चॉकलेट उपलब्‍ध असून अगदी १५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत ती सहज उपलब्‍ध आहेत.

संबंधित पोस्ट

डिजीटल होर्डींग, सोशल मिडीया, सेल्फी बूथ अशा विविध माध्यमांतून नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;क्षेत्रिय अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान

भीमा कोरेगाव हिंसाचार  प्रकरणा तिल फादर स्टेन  यांच्या संगणकामध्ये हॅकरने प्लांट केली 44 आक्षेपार्ह कागदपत्रे- रिपोर्ट..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईत धक्कादायक घटना :अल्पवयीन मुलीची छेडछाड, तिला वाचवण्यासाठी गेलेल्या बापाचा मारहाणीत मृत्यू

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धीसाठी-हिंदु जनजागृती समितीची मुंबई सहपोलीस आयुक्तांकडे तक्रार खोट्या तक्रारी करून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्थेवर कारवाई करा !

vishwatmaklokswamivarta