vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विख्यात कन्नड अभिनेते पुनित राजकुमार  अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी…

 विख्यात कन्नड अभिनेते पुनित राजकुमार  अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी….

कर्नाटक प्रतिनिधी

विख्यात कन्नड अभिनेते पुनित राजकुमार  यांचं शुक्रवारी हृदयविकाराने निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. पुनित यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटविश्व आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या कलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी शुक्रवारी रात्री चाहत्यांनी बेंगळुरूमधील कांतीरवा स्टेडियममध्ये तोबा गर्दी केली होती. पुनित यांची मुलगी अमेरिकेतून परत येताच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी रेवनाथ आणि दोन कन्या असा परिवार आहे. अप्पू, वीरा कन्नडिगा तसंच मौर्य या चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे ते पुत्र होत. बालकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीस सुरुवात केली. कन्नड चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारे ते कलाकार होते. चाहत्यांमध्ये ते अप्पू या नावाने ओळखले जात होते. अचानक छातीत दुखू लागल्याने पुनित यांना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बेंगळुरूमधील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्याच्या काही काळानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

पुनित यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यासह बॉलिवूडमधल्याही अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. “माझ्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तुझ्या निधनाचं वृत्त अजूनही मला सत्य वाटत नाही”, असं ट्विट अभिनेता आर. माधवनने केलं. अनिल कपूरनेही ट्विट करत पुनित यांना श्रद्धांजली

संबंधित पोस्ट

संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत विभागीय आयुक्त साधणार पाणीटंचाई व पाणीपुरवठा या विषयावर थेट संवाद २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भ्रष्टाचारी असल्याचे सांगता मग त्याच पक्षाच्या लोकांना सत्तेत कसे घेतले?  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार

छायाचित्र प्रदर्शन उद्घाटन प्रदर्शनाद्वारे पुढच्या पिढीपर्यंत मुक्तिसंग्रामाचा इतिहास पोहोचवा- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे आरपीआय हेच मातृस्थान* 

vishwatmaklokswamivarta

भाजप जालना महानगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल भास्कर आबा दानवे यांचा माजी मंत्री तथा जालना विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार

मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून माध्यम नियंत्रण कक्षाची व निवडणूक तक्रार निवारण कक्षाची पाहणी …