vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महा विकास आघाडी  सरकारला लागोपाठ दुसरा झटका; अजित पवारांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची कारवाई…

महा विकास आघाडी  सरकारला लागोपाठ दुसरा झटका; अजित पवारांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची कारवाई…

 

 

मुंबई: प्रतिनिधी अनिल देशमुख यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडीला दुसरा झटका लागला आहे. कारण अजित पवार यांच्या मालमत्तांवर आता आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आयकर विभागाची कारवाई सुरु झाली असून हा महाविकास आघाडीला दुसरा झटका मानला जात आहे. या कारवाईमुळे आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या कारवाईअंतर्गत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची प्रॉपर्टी ‘अटॅच’ करण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई झाली असून 90 दिवसांच्या कालावधीत प्रॉपर्टी बेनामी नसल्याची सत्यता सिद्ध करावी लागणार आहे.

कुठे कुठे कारवाई?आयकर विभागाने केलेल्या बेनामी मालमत्तेवरील कारवाईमध्ये हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता आहे. या मालमत्तेवर कारवाई होत असून ती प्रोव्हीजनली अटॅच करण्यात आली आहे. यामध्ये 600 कोटींची जरंडेश्वर कारखान्याची मालमत्ता, साऊथ दिल्लीतील 20 कोटींचा फ्लॅट, 25 कोटींचे मुंबईतील निर्मल हाऊस, गोव्यातील निलाय नावाचे रेसॉर्ट तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 27 ठिकाणच्या जमिनी समाविष्ट आहेत. ही सारी मालमत्ता ‘बेनामी’ ठरवण्यात आलं आहे. ही मालमत्ता बेनामी नसल्याचं आता अजित पवार यांना सिद्ध करावं लागणार आहे, त्यासाठी त्यांना 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

दिव्यांगांना आनंदमय जीवन जगता यावे यासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे दिव्यांग व्यक्तिंना कृत्रिम अवयव व सहायभूत साधनांचे मोफत वितरण.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना -२६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण आराखडा तयार करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण: आंदोलनस्थळी आमदार-खासदारांची उपस्थिती…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा

महानेट योजना गतीने पूर्ण करणार- मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत