vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महानेट योजना गतीने पूर्ण करणार- मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

महानेट योजना गतीने पूर्ण करणार- मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

 

            राज्य प्रतिनिधी: महाआयटी कडून राज्यातील २६ जिल्ह्यांची १५३ तालुक्यातील सुमारे १२ हजार ५१३ ग्रामपंचायतींना फायबर ऑप्टिकल केबल नेटवर्कचा वापर करून हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पारदर्शकतेने अंमलबजावणी करण्यात येत असून हे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री प्रा.डॉ तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत उत्तर देताना सांगितले.

 

माहिती तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘महानेट’चे काम वेळेत होण्याबाबत विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

मंत्री प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, महानेट ही योजना राज्यात निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हे काम करताना काही अडचणी आल्यास त्यावर मार्ग काढून कामे पूर्ण केली जात आहेत. गावात काम करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात आहे. राज्यात महानेटअंतर्गत ९ हजार ९११ ग्रामपंचायतीमध्ये राऊटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. ५६ हजार ०६७ किलो मीटर फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याच्या उद्दिष्टापैकी ५० हजार ४९९ म्हणजेच ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. महाआयटी मार्फत शासनाच्या ३८ विभागांच्या ४५ सेवांचा नागरिकांना ऑनलाईन लाभ घेता येत आहे. यामध्ये ज्या विभागांच्या योजनांची माहिती अपलोड करणे अद्याप बाकी आहे त्या विभागांना देखील सूचना देऊन लवकरच इतर विभागांच्या योजनांचाही ऑनलाईन लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

 

या लक्षवेधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

संबंधित पोस्ट

निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय  स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ  

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी विभागात अनियमित व निकृष्ट धान्य पुरवठा केल्याबाबत शिधावाटप अधिकाऱ्यांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद येथील पैठणच्या यात्रा मैदानावरील ४४ अनधिकृत गाळे पाडले, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाडण्यात आले.

नवी मुंबईत नेरूळच्या वंडर्स पार्कमध्ये भीषण दुर्घटना थोडक्यात टळली.  दुसऱ्याच दिवशी अपघात, सात जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री यांच्याशी बोलणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

13 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta