vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वानखेडेंनी आर्यनचं अपहरण करून खंडणी मागितली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक

वानखेडेंनी आर्यनचं अपहरण करून खंडणी मागितली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई प्रतिनिधी

समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, मला या तपासातून हटवण्यात आलेलं नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेतर्फे व्हावा यासाठी मीच न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबईतील कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरणसुद्धा तापलं आहे. गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंनी केलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर काही पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंबाबत गौप्यस्फोट करत गंभीर असे आरोपही केले.

 

दरम्यान, शुक्रवारी आर्यन खान केसचा तपास एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात आला आहे. यानंतर समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, मला या तपासातून हटवण्यात आलेलं नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेतर्फे व्हावा यासाठी मीच न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरूनही नवाब मलिका यांनी वानखेडेंवर टीका केली.

नवाब मलिक यांनी शुक्रवारी ट्विट करून म्हटलं की, समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणासह एकूण ५ प्रकरणांच्या तपासातून हटवलं आहे. अशी २६ प्रकरणं असून त्यांचा तपास होण्याची गरज आहे. ही एक सुरुवात आहे आणि व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरंच काही करण्याची आवश्यकता आहे, आम्ही ते करू असंही नवाब मलिक यांनी ट्विटरवर म्हटलं होतं.

संबंधित पोस्ट

अनेक ऐतिहासिक घटना कधीच शिकवल्या गेल्या नाहीत, मोहन भागवतांचे वक्तव्य

गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आढावा बैठकीत निर्देश

मोठी बातमी! देवेंद्र फडणवसींचा ‘पेन ड्राईव्ह’ बॉम्ब, राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचा दावा….

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

देशभरातील विविध राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

vishwatmaklokswamivarta

आशिष शेलारांना धमकीचा फोन; यापुर्वी दहशतवाद्यांनीही पडताळणी केली होती यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे …