vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

भाऊबीजेच्या सणाची कथा*

————————————-

*भाऊबीजेच्या सणाची कथा*

भाऊबीजेचा सण का साजरा केला जातो, जाणून घ्या यामागील आख्यायिका –*

असे मानले जाते की या दिवशी जी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावते त्याला अकाली मृत्यूचे भय राहत नाही.

यामागे एक आख्यायिका आहे. पौराणिक कथेनुसार, यमुना ही आपला भाऊ यमराजला भेटण्यासाठी अनेकदा आमंत्रम देत असत. पण, तरीदेखील यमराज त्यांना भेटायला जायचे नाही. मग एके दिवशी यमराज आपल्या बहिणीला भेटायला पोहोचले. त्यांना पाहून यमुनेला खूप आनंद झाला. यमुनेनी यमराजांचे खूप प्रेमाने आणि आदराने आदरातिथ्य केले. त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार केले. तसेच त्यांना टिळा लावून त्यांनी आरती केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

बहिणीचे हे प्रेम पाहून यमराज खूप आनंदी झालेत आणि त्यांनी तिला एक वरदान मागायला सांगितले. तेव्हा, यमुना म्हणाली की, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही माझ्या घरी यावे आणि जो कोणी भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन टिळा लावेल, त्याला यमाची आणि अकाली मृत्यूची भीती बाळगायची गरज पडू नये. यमराजाने आपल्या बहिणीची ईच्छा पूर्ण केली आणि तिला तिने मागितलेले वरदान दिले. तेव्हापासून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाऊ लागला.

भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाशी संबंधित आहे. यादिवशी, बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर प्रेमाने टिळा लावताता आणि त्यांना दीर्घायुष्य, चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतात. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजऱ्या होणाऱ्या या सणाला भाई टिका, यम द्वितीया, भात्री द्वितीया असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी जी बहीण आपल्या भावाला टिळा लावते त्याला अकाली मृत्यूची भीती नसते.

———————————————–

संबंधित पोस्ट

शिवलीलामृत* 🌹 ( मराठी विवेचनासह ) *अध्याय पहिला*

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा

अथर्वशीर्ष म्हणजे कांय…?

vishwatmaklokswamivarta

जगतज्योती युगपुरुष महामानव क्रांतीसुर्य महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…🙏🚩

खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) फाल्गुन शु. १५, मंगळवार, ३ मार्च २०२६.*

शिवलिंगाची उत्पत्ती*