
राज्यात संपाची तीव्रता वाढली, दुसरीकडे कारवाईचा बडगा, तब्बल 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन.
महाराष्ट्र प्रतिनिधी : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाता आता तीव्र स्वरुप धारण केलंय. तर दुसरीकडे आता राज्य सरकारनेदेखील कडक पवित्रा धारण केलाय. एसटी महामंडळाने एकूण 45 आगारांमधील तब्बल 376 कर्मचाऱ्यांचे निलबंन केलं आहे. नांदडे, यवतमाळ, वर्धा, सांगली या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे ही कारवाई करण्यात आलीय.
एसटी महामंडळाचे कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून संपावर आहेत. राज्यभरात हा संप सुरु असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. एसी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही संपकऱ्यांची मुख्य मागणी आहे. या आंदोलनादरम्यान एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्यादेखील केली. ऐन दिवळीत संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल होत असून कामावर रुजू व्हावे असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तर दुसरीकडे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत संप मागे घेतला जणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर एसी महामंडळाने निलंबनाचे हत्यार उपसले आहे. आतापर्यंत 16 विभागातील 45 आगारांमधील 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, भंडारा, औरंगाबाद, नागपूर, जालना अशा विभागांचा समावेश आहे. नांदेड, यवतमाळ सांगली या तीन विभागामध्ये एकूण 150 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे



