vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराची जमीन हडपली’, राष्ट्रवादी पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट….

 ‘भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराची जमीन हडपली’, राष्ट्रवादी पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट….

मुंबई प्रतिनिधी

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  हे गेल्या महिन्याभरापासून साधारण दररोज नवनवे आरोप करुन भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर अॅक्शनमध्ये आलेले नवाब मलिक हे अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीएत. आज (12 नोव्हेंबर) पुन्हा एकदा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी भाजपच्या एका माजी मंत्र्यावर मंदिराची हजारो एकर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे.  लवकरच आपण या माजी मंत्र्यांचा भांडाफोड करु असं देखील मलिकांनी यावेळी

‘भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराची जमीन हडपली’

‘वक्फ बोर्डाता क्लीन अप ऑपरेशन सुरु झालं आहे. भाजपचे लोक म्हणतात नवाब मलिकांचा वक्फ बोर्डाचा घोटाळा बाहेर काढू. मी तर सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या मंदिर, मस्जिद, दर्गा यांच्या जमिनी हडपण्याचं काम या महाराष्ट्रात केलं आहे भाजपच्या एका माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडपली आहे. माझी तर इच्छा आहे की, ज्या जमिनी ईश्वराच्या, अल्लाच्या नावे देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशा जमिनी ज्यांनी लुटल्या आहेत त्या सगळ्यांना तुरुंगात टाकलं जावं.’ असं आव्हानच नवाब मलिकांनी यावेळी दिलं आहे.

‘आम्ही तर कारवाई सुरु केली आहे. ईडी देखील त्यात आम्हाला सहयोग करेल अशी मी अपेक्षा करतो. पण मंदिराची जमीन माजी मंत्र्यांने कशी हडपली, कसे शेकडो करोड रुपये खाल्ले त्याचा देखील भांडाफोड करु.’ असा गौप्यस्फोट मलिकांनी यावेळी केला आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे माजी आमदार श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

vishwatmaklokswamivarta

परभणीसाठी उदयोन्मुख जिल्हा दर्जा, झोन-१ व डी+ श्रेणी मंजूर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रयत्नांना यश

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना -नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्य वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांनीही नवनवीन शोध लावून क्रांतीकारक उत्पादने तयार करावीत. यामुळे निर्यात वाढेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोत्रोग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

vishwatmaklokswamivarta

यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा

vishwatmaklokswamivarta

प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांची समिती- प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती गडचिरोलीत दोनशे खाटांचे नवीन स्त्री रुग्णालय..

vishwatmaklokswamivarta