vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची तोडफोड आणि दगडफेक,

अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची तोडफोड आणि दगडफेक,

अमरावती प्रतिनिधी:

त्रिपुरा राज्यात मशिदीत हिंदूंनी तोडफोड केली आहे आणि मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम समाजाने केला. याचाच निषेध नोंदवण्यासाठी अमरावती शहरात मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली.

15 ते 20 हजार लोकांनी मोर्चाही काढला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चा करांनी जयस्तंभ चौकातील आणि शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली. तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली. मोर्चा दरम्यान मोर्चेकरांनी भाजप विरोधात आणि आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने सामने देखील आले होते तर यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याने जखमी झाल्याची माहिती आहे दरम्यान या मुस्लिम समाजाच्या मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले असून शहरात तणाव निर्माण झाला आहे तर या विरोधात भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि भाजप नेते तुषार भारतीय सह भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आले. तातडीने अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या मुस्लिम समाजाच्या लोकांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे.

मालेगावातही घोषणाबाजी

त्रिपुरा येथील विशिष्ट समुदायाविरोधात झालेल्या हिंसेच्या विरोधात महाराष्ट्रात आज बंद पुकारण्यात आला होता. मालेगाव हा मुस्लिमबहुल भाग आहे या ठिकाणी हा बंद दुपारपर्यंत शांततेत सुरू होता. मात्र अचानक जमावाने या ठिकाणी जमा होत घोषणाबाजी सुरू केली आणि जमाव आक्रमक होत गेला.

जमाव रस्त्यावर येतोय हे बघून पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने दगडफेक केली. यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवलं आहे.

 

संबंधित पोस्ट

बागेश्वर धाम बालाजी हनुमान मंदिराचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना नागपूर पोलिसांकडून क्लीन चिट; मिळाला नाही अंधश्रध्दा पसरवत असल्याचा पुरावा

vishwatmaklokswamivarta

प्रतिबंधात्मक आदेश

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, 15 कोटी लोकांसाठी नव्या नियमाचा फायदा…

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री मकरंद जाधव पाटील· पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली.

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

सुखकर प्रवासासाठी हेल्मेटचा वापर व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक-असे मत पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव

vishwatmaklokswamivarta