vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय! ‘स्पेशल ट्रेन’ होणार बंद; कोरोनापूर्वीचे तिकीट दर लागू…

रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय! ‘स्पेशल ट्रेन’ होणार बंद; कोरोनापूर्वीचे तिकीट दर लागू…

करोना काळात  आधी धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात 1700 पेक्षा अधिक गाड्या सुरू केल्या जाणार आहेत.

मुंबई प्रतिनिधी रेल्वे मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना आधी आकारले जाणारे भाडेदर लागू करण्यात आले आहेत. म्हणजे स्पेशल रेल्वेने प्रवास करण्यासाठी आकारले जाणारे भाडे आता बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता जनरल तिकीट पद्धतही बंद करण्यात आली आहे.

 

आरक्षण मिळालेल्या आणि वेटिंगवर असलेल्यांनाच प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने परिपत्रकातून स्पष्ट केलं आहे. जनरल बोगीसाठीचं तिकीट असणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे निर्णय लागू होण्याआधी ज्यांनी तिकीट आरक्षित केलेले आहेत. त्यांच्याकडून वाढीव भाडं घेतलं जाणार नाही. त्याचबरोबर पैसेही परत केले जाणार नाही.

 

रेल्वे मंत्रालयाकडून एक्स्प्रेस गाड्या आणि भाडेदरात बदल करण्यात आले असले, तरी कोरोना प्रोटोकॉलचा नियम कायम असणार आहे. प्रवाशांना कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे. 25 मार्च 2020 रोजी देशातील रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती.

166 वर्षांत पहिल्यांदाच रेल्वे सेवेला ब्रेक लागला होता. मात्र, हळूहळू रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. यात सर्वात आधी मालगाड्या आणि श्रमिक रेल्वे एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या.

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी,5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देवू – केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम जनजातीय गौरव दिवसनिमित्त तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस नेते पवन खेडा यांना विमानातून उतरवून अटक, असम पोलिसांची कारवाई..

vishwatmaklokswamivarta

देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव हा राज्य महोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. -अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून..

vishwatmaklokswamivarta