vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड ,हिंगोली प्रतिनिधी

दि. ३ :ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०७:४६ व ०९:४३ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ३.३ व ४.५ इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ असल्याचे समजते.

या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून, सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितपणे घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

बंद्यांच्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पुढाकार नांदेड जिल्हा कारागृहातील ४२ बंद्यांचे फार्मर आयडी तयार; २६ जणांचे कर्जमाफीसाठी ई-केवायसी अद्ययावत,बंदी कारागृहात, पण कुटुंबाच्या शेतीला शासकीय योजनांचे कवच!

vishwatmaklokswamivarta

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन

राज्यपालांच्या हस्ते संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे प्रकाशन

महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणिमार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार